घुग्घुस(प्र.ति ) : घुग्घुस येथे सराफा दुकानात अज्ञातांनी चोरी केल्याची घटना 6 फेब्रुवारीला उघडकीस आली. बँक ऑफ इंडिया चौकातील श्री बालाजी ज्वेलरी दुकानांत चोरी दररोज प्रमाणे सतीश रंगुवार हे दुकान बंद करून घरी गेले मात्र अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री च्या सुमारास 3 अज्ञात आरोपींनी शटर लॉक तोडत आत प्रवेश केला व चांदीचे आभूषण, अंगुठी, प्लेट यावर हात साफ केला, दुकानातील मुख्य तिजोरीला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींना ते जमलेला नाही त्यामुळे चांदीच्या वस्तू घेत ते पसार झाले.बँक ऑफ इंडिया चौकात अनेक बँकांचे एटीएम सेंटर आहे त्या सीसीटीव्ही मध्ये ते 3 आरोपी कैद झाले आहे, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे व पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे हे आपल्या ताफ्यासह पोहचले असून घटनेची चौकशी करीत आहे.
Related Articles
ओबीसींचे राजुरा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
Posted on Author Maha Vidarbha
राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटनांचा सहभाग. राजुरा :– राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी व सर्व जातीय संघटना यांनी ओबीसी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी मागील 14 दिवसापासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून राजुरा तालुक्यात तहसील कार्यालय राजुरा समोरील मंडपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भूषण फुसे हे या एक […]
सावधान! राज्यात सोमवारपासून उष्णतेची तीव्र लाट
Posted on Author Maha Vidarbha
अवकाळी पाऊस हजेरी लावून गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट आलं आहे. सोमवारी २५ एप्रिलपासून २७ एप्रिलर्यंत अहमदनगर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. या काळात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. केवळ अहमदनगरच नव्हे तर मध्य भारतातच ही उष्णतेची लाट आली येत आहे. पुढील पाच दिवस गुजरात राज्यात तसंच दक्षिण […]



