*महानगर भाजपाचे आज धरणे आंदोलन
चंद्रपूर (का.प्र ):येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे उद्या गुरुवार १७ डिसेंम्बर ला सकाळी ११ वाजता दै.महाविदर्भ समोरच्या रस्त्यावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.माजी वित्तमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे करणार आहेत.यावेळी महापौर राखी कांचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर,धनराज कोवे,धम्मप्रकाश भस्मे आदींची उपस्थिती राहणार आहे.हॉटेल सिद्धार्थ ते बंगाली कॅम्प पर्यंतचा रस्त्याची हालत खस्ता झाली असून तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपुर तर्फे जिल्हाधिकाऱ्याना शुक्रवार ११ डिसेंम्बरला दिलेल्या निवेदनातुन केली होती.७ दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनातर्फे कोणतेही ठोस पाउलण्यात आले नाही.गेले कित्येक वर्षांपासून हॉटेल सिद्धार्थ ते बंगाली कॅम्प चौक पर्यंतचा रस्ता अनेक वेळा डागडुगी करून दुरुस्त करण्यात आला पण पुन्हा रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले.कोट्यवधी खर्च करूनही समस्या जैसे थे आहे.परिणामी अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर काहींना व्यंगत्व आले.शहरातील हा परिसर सर्वाधिक वर्दळीचा आहे,पण या रस्त्याची सद्या स्थिती जिवघेणी आहे.हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा म्हणून धरणे आंदोलन केले जात आहे.नागरिकांनी सहभागी असे आवाहन भाजपा महानगर तर्फे करण्यात आले आहे.



