गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात एका मृत्यूसह 52 नवीन कोरोना बाधित

* तर 77 कोरोनामुक्त*
*गडचिरोली,(जिमाका) दि.29* :गेल्या चोवीस तासात जिल्हयात 52 नवीन बाधित आढळून आले तसेच 77 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7915 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7124 वर पोहचली. तसेच सद्या 712 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 79 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये आष्टी चामोर्शी येथील मधूमेहग्रस्त पुरूषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.01 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.00 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.नवीन 52 बाधितांमध्ये गडचिरोली 19, अहेरी 15, आरमोरी 5, भामरागड 02, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 77 रूग्णांमध्ये गडचिरोली 38, अहेरी 5, आरमोरी 9, भामरागड 3, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 2, मुलचेरा 2, सिरोंचा 2, कोरची 0, कुरखेडा 6 व वडसा मधील 9 जणाचा समावेश आहे.गडचिरोली तालुक्यातील नवीन 19 बाधितांमध्ये इतर जिल्हयातील 3, गांधी वार्ड 1, भामरागड रहीवासी 1, नवेगाव 2, शहरातील इतर 1, हनुमानवार्ड 1, बालाजीनगर 1, पोलीस कॉलनी 1, सुप्रसाद मंगल कार्यालय 2, गोकूळनगर 1, रामनगर 1, पारडी 2, विवेकानंद नगर 2 व कारगील चौक 1 जणाचा समावेश आहे. अहेरी 15 मध्ये आलापल्ली 4, राजाराम 1, नागेपल्ली 1, जिमलगट्टा 1, वेलगूर 1 व इतर 7 अहेरी शहरातील आहेत. आरमोरी 5 मधील सर्व शहरातील आहेत. भामरागड 2 शहरातील आहेत. चामोर्शी मधील 3 आष्टी येथील आहेत. धानोरा व एटापल्ली मधील 1-1 शहरातीलच आहेत. मुलचेरामधील 1 लगाम मधील आहे. वडसा मधील 5 मध्ये पाम सीटी मधील 2, गांधीवार्ड 1, सावंगी 1 व डोकेसारंदी येथील 1 जण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.