चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : जिवती, कोरपना व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.जिवती नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी रोहन घुघे, कोरपना नगरपंचायती साठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्धन लोंढे, तर गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) प्रियंका पवार-कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली संबंधीत नगरपंचायत कार्यालयात दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Related Articles
संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम शिक्षण विभागाकडून ‘शिक्षक संवाद दिन’ उपक्रमाची सुरवात चंद्रपूर दि. 1 मे : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. महाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनाच्या तसेच नैसर्गिक संकटावर मात करून राज्य सरकार […]
पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील १० हजार मजुरांना मोठा दिलासा
चंद्रपूर (का.प्र.) जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे.कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत.यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत अशा १० हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलंगना सरकार करून देणार असल्याने त्यांच्या सह त्यांच्या […]
विश्रामगृहातून उलगडणार चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास – पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : नवीन शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमातून चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास उलगडणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सुधाकर अडबाले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे , […]



