
राजुरा (ता.प्र)राहुलजी गांधी अणि स्थानिक आमदार सुभाष धोटे यांच्या आदेशानुसार व नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉंग्रेस कार्यकर्ते जनसेवेच्या कामाला लागले असून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात राजूèयात अडकून पडलेल्या निराश्रित लोकाना मदत करीत आहेत. सर्वांना जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत. आज सकाळी राजस्थान राज्यातील ३० युवक हे मांचीरियाल येथून आले असता ज्योतिबा विद्यालयात यांच्या जेवणाची सोय आणि पंडरपाऊनी येथील मध्य प्रदेशातील ८० लोकांच्या जेवणाची सोय भवानी मंदिर देवस्थान येथे करण्यात आली होती. या प्रसंगी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राव, राकेश बेतावर, सागर बेतावर, राकेश जगताप, संदीप आदे, यांनी ही व्यवस्था बघितल. युयुव काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी उचललेल्या या पावलाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.



