चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील 32 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.7 ऑगस्टला त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता नंतर 12 ऑगस्टला त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 11 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृत्यूने वैधकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे, जिल्ह्यात आज जवळपास 60 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या वाढलेली असून प्रशासन नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करीत आहे.
Related Articles
सर्वसामान्यांना न्याय देत शक्तीशाली भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला शितारमन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून कृषी, व्यापार, शिक्षण क्षेत्राला बळ मिळणार आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्नाला कर मुक्त करण्यात आले आहे. मच्छीमारांसाठी करण्यात आलेल्या मोठ्या निधीच्या तरतुदीमुळे शेतीसह जोडधंद्याला चालना मिळणारा असुन हा सर्वसामान्यांना न्याय देत शक्तीशाली भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. रेल्वेच्या […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात 137 कोरोनामुक्त, 58 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू चंद्रपूर,दि.15जून : गत 24 तासात जिल्ह्यात 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 58 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 58 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 5, भद्रावती 1, […]
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिरिक्त १० डायलिसीस मशीन वाढवा :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांची मागणी.
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा हा औद्योगीक जिल्हा असल्याने येथे सर्वसामान्य व गरीब कुटुंबाचे देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. उद्योगाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदुषणामुळे या जिल्हयातील लोकांना विविध आजाराने ग्रासले आहे. या विविध आजारांसह या जिल्हयातील जवळपास ५ हजारांहून जास्त रुग्णांना किडणीचे आजार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. किडणीचे आजार होऊन एक स्तरावर वाढल्यानंतर त्या रुग्णांना नियमितपणे डायलिसीस […]



