चंद्रपूर(का.प्र):चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे
Related Articles
“कर्करोग निदान ‘अद्यावत वाहनाचे ब्रह्मपुरीत लोकार्पण
राजकारण म्हणजे जनतेची सेवा करण्याकरिता मिळालेली जबाबदारीची संधी होय. एक सच्चा जनप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण फेडण्याकरिता क्षेत्र विकासासह प्रत्येक मूलभूत समस्यासह आरोग्य रक्षणाची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधीवर असते. राजकारणात संधी साधूंनी स्वार्थ साधले मात्र आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघातील हजारोंच्यावर नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राणघातक रोगांपासून लढण्यास सहकार्य केले. […]
चंद्रापुरात कोरोनाचा महाविस्फोट; गेल्या २४ तासात ३३१ जण कोरोना बाधित
*जिह्यात गेल्या २४ तासात ३३१ जण कोरोना बाधित *आतापर्यंतची सर्वात जास्त रुग्ण संख्या *आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४३८६ *आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या २२३२ *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी रहा. सुरक्षित रहा.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराअभावी युवतीचा मृत्यू दोषींवर कारवाई करण्याची मागणी
रक्ताची कमतरता असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका १७ वर्षीय युवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सानिका कोंडुजी अनमुलवार असे मृत मुलीचे नाव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील कोंडुजी अनमुलवार यांच्या सानिका या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. […]


