गडचिरोली

चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, एक जण जखमी

प्रतिनिधी/ गडचिरोली : वीज पडून दोघे जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना आज २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर व सोमनपुर येथे घडली. मृतकामध्ये एका बालकाचा समावेश आहे. तसेच धर्मपूर येथे वीज कोसळल्याने एक बैल सुध्दा ठार झाला.
दुगार्पूर येथे शेतात काम करीत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास रुपेश उपेन बाच्याङ (१६) याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाला. येणापूरचे तलाठी बाविस्कर पंचनामा केला. तर दुसऱ्या घटनेत सोमनपुर येथे शेतात काम करीत असताना भैय्याजी राघोबा मडावी (४२) यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले . तर जयश्री जोतिन आत्राम (३२) हि महिला जखमी झाली. तिला अडपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेचा पंचनामा तलाठी नागरगोटे यांनी केला. तरतिसऱ्या घटनेत धर्मपुर येतील काशिनाथ दसरु आत्राम यांचे शेतात बैल चारत असताना आज दुपारी ३ वाजताच दरम्यान वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. सदर घटनेचा पंचनामा वायगावचे तलाठी नितीन मेश्राम यांनी केली. मृतकाच्या कुटुंबियांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.