गडचिरोली

सीआरपीएफ मधील ३ जणांचे व अहेरी येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

गडचिरोली(प्रती):दि.८ जुलै दु.२.००वा.: गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन १९२ मधील ३ व अहेरी येथील विलगीकरणात असलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५९ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १२४ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ६८ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ९ जिल्ह्याबाहेरील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.