चंद्रपुर जिल्हा

वेकोलीने धोपटाळा प्रकल्प सुरू करावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचे टावर आंदोलन.

राजुरा (ता.प्र) :– वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत धोपटाळा प्रकल्पासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि संपूर्ण कार्यवाही पूर्ण होऊनही प्रकल्प रेंगाळत ठेवणाऱ्या वेकोली प्रशासनाचा निषेध तसेच क्षेत्रातील वेकोली बल्लारपूर आणि सर्व नागरिकांचे लक्ष प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे खेचण्यासाठी आज दिनांक 26/6/2020 रोज शुक्रवार ला धोपटाळा प्रकल्पग्रस्तांनी अभिनव आंदोलन सुरू केले आहे. मुख्य महाप्रबंधक कार्यालय जवळील बीएससएनएल ऑफिस जवळील टावरवर विलास घटे, मारोती मावलीकर, संजय बेले हे आपल्या हक्कासाठी, आपल्या मांगन्यासाठी जीव हातात घेऊन टावर वर चढ़ले आहेेेत. आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी सर्व प्रकल्पग्रस्त्तांना मोठा लढा उभारण्याचे आवाहन करीत आहेत. परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्ररितपणे हे आंदोलन करीत आहेत. आता वेकोली प्रशासन याा आंदोलनाकडे कसा सकारात्मक प्रतिसाद देते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.