राजुरा(प्रति) :— काल रात्रौ च्या सुमारास गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रा येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली.बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यात रात्रौ ३:००च्या दरम्यान एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्यांने गाडीची स्पीड अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले.पाठलाग केल्यानंतर ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला.पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्या मुळे त्याला थांबावे लागले सिनेस्टाईल पाठलाग करतात बजरंग दलाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली. पण दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.मग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, पोलिस विभागाच्या मदतीने दोन्ही ट्रक ठाण्यात आणण्यात आले.बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता.जीवाला उदार होऊन गौ मातांचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे, पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही, आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा शासनाने केला.पण अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजही रोज गाई ची कत्तल सुरू आहे . शासन व प्रशासन कारवाई न करता डोळे मिटून शांत झोप घेत आहेत.शासनाने या गंभीर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधित गोमाता पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी करीत असुन .पुढील प्रकरणाचा तपास राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.या तपासाअंती त्या गोमाता पळविणाऱ्या टोळीवर व संबंधित ट्रक ड्रायव्हर वर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related Articles
भगवान गौतम बुद्धांच्या अहिंसा, करुना, शांती या विचारांमुळे समाजाला आर्दश मार्ग मिळाला – आ. किशोर जोरगेवार
मोरवा येथे तथागत बुद्ध विहाराचे अनावरण, मुर्ती प्रतिस्थापना व भिम गीत कार्यक्रमाचे आयोजन भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला शांतीचा संदेश दिला. समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीतुन अनेकांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या हिंसा, करुना, शांती या विचारांमुळे समाजाला आर्दश मार्ग मिळाला असे […]
संगणक परिचालकांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सुधीरभाऊ मुनगंटीवार
जिवती : राज्यात जवळपास २७००० संगणक परिचालक मागील ११ वर्षांपासून ग्राम पंचायत येथे सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामे तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. परंतु ११ वर्षांपासून महागाई वाढत चालली परंतु संगणक परीचालकांच्या मानधनात मात्र वाढ झालीच नाही. संगणक परिचालक यांची पदनिश्चिती करून कायमस्वरूपी करण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करावी अशा […]
चिचडोह बँरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार
नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावांना व ग्रामपंचायतींनी […]



