चंद्रपुर जिल्हा

रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ट्रकने 4 दुचाकींना चिरडले.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा बामणी मार्गावरील उड्डाणपुलावरून राजुरा मार्गे छत्तीसगड राज्यात जाणार्‍या आयशर क्रमांक MH40 BL1818 ह्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 दुचाकींना भरधाव येत धडक दिली. आज दुपारी दिड वाजताच्या दरम्यान राजुरा बामणी मार्गावर हा अपघात घडला यामुळे वाहतुक विस्कळित झाली आहे.सविस्तर वृत्त असे की अचानक पाऊस सुरू झाल्याने राजुरा बामणी मार्गाने प्रवास करणारे दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला दुचाक्या उभ्या करून बाजुलाच थांबले होते. त्याचदरम्यान राजुरा शहरातून येणारा आयशर ट्रक रेल्वे उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने आला. अनियंत्रित झालेल्या ह्या ट्रकने उभ्या असलेल्या 4 दुचाकींना अक्षरशः चिरडले. सुदैवाने ह्या अपघातात कुठलीही प्राणहानी झाली नाही.हा उड्डाणपुल जड वाहतुकीस प्रतिबंधित असल्याचे फलक पुलाच्या दोन्ही बाजूस लावले असूनही पुलावरून सुरुवातीपासून जड वाहतुक सुरू आहे. ह्या पुलावर मागे एका 80 वर्षीय वृद्धाचा अपघात होऊन त्यांचे निधन झाले होते. 4 दिवसापूर्वीच अशाच एका अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आता तरी वाहतुक पोलीस विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या घटनांची दखल घेऊन जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.