
भारताचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी सर्व भारतीयांना
दि.२२ मार्च २०२० रविवार
रोजी सकाळी ७ ते रात्रौ ९
पर्यंत आपण सर्व नागरिक
‘स्वतः जनता कफ्र्यू’ करावा
असे आवाहन केले असता
सिंदेवाही शहरात बस स्टॉप वर
कुणीही रस्त्यावर फिरता नी
दिसत नाही आणि चौका
चौकात शुकशुकाट .व शांत
दिसत आहे पूर्ण पणे
नागरिकांनी घरीच राहणे पसंत
केले आहे .या कफ्र्यू ला जनता
सहकार्य करीत आहे .
अत्यावश्यक सेवा म्हणून
मेडिकल व दवाखाने हे सर्व बंद
अवस्थेत आहे .चौकचौकत जी
गर्दी दिसत होती ती गर्दी
दिसेनासी झाली आहे, या
कोरोणा संसर्गजन रोगाला
पळवून लावण्याकरिता जनता
कफ्र्यू मधे कोणीच भटकताना
दिसत नाही आहे . या जनता
कफ्र्यूला सर्व सिंदेवाही कर
आपले राष्ट्रीय कर्तव्य समजुन
पालन करीत आहेत आणि स्टे
ऐट होम जनता कफ्र्यू च्या
आवाहनास प्रतिसाद देत
आहेत.



