
राजुरा(ता.प्र )प्रा. प्रफुल्ल शेंडे — राजुरा पोलीस नियमित गस्त करीत असताना पोलिसांना पाहून दुचाकी भरधाव वेगाने नेत असल्याचे संशयावरून त्याचा पाठलाग करीत पकडले आणि त्याचे दुचाकीवर असलेल्या बॅग,व चुगळीची तपासणी केली असता त्यात आदेश-24,काव्या-25,राशी-19,अशी नावे असलेली HTBT कंपनीचे 51 हजार रुपये किमतीचे 68 पाकीट चोरबीटी बियाणे आढळून आले त्यामूळे आरोपीस ताब्यातघेऊन बियांणाची पडताडणी व कारवाई होणे करिता,तालुका कृषी विभागाला माहिती देण्यात आली कृषी विभागाचे अहवाल वरून प्रतिबंधित कापूस HTBT बियाणे साठवणूक व जवळ बाळगणे,आणि शासनाची तसेच विक्री उद्देशाने शेतकऱ्याची फसवणूक करण्याकरिता आरोपीने हे बियाणे बाळगले असा अहवाल तथा फिर्याद तालुका कृषी अधिकारी गुलाब कडलग यांनी दिली त्यावरून आरोपी प्रफ्फुल मनोहर गिरसावळे यास अटक करून विविध कलमानवे गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव याचे मार्गदर्शनात ठाणेदार नरेंद्र कोसुरकर,सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे,संपत पुलीपाका,प्रवीण डवरे उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे,तालुका कृषी अधिकारी गुलाब कडलग,चेतन चव्हाण यांनी केली आहे.



