चंद्रपूर(का.प्र.) महानगरातील स्नेह नगर परिसरातील २८ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित नागरिकांची संख्या ५७ झाली आहे. हा युवक १३ जून रोजी मुंबईवरून परत आला होता. त्याला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. आरोग्य सेतू अँपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली. २१ जून रोजी या युवकाचे स्वॅब घेण्यात आले होते. २२ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ बाधित बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये केवळ १५ अक्टिव्ह बाधित आहेत.




