चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

सुदृढ शरीरामध्ये आनंदी मन राहतं जर मन आनंदी असेल तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून समाजासाठी अनेक उत्तम कार्य घडत असतात – ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार

मन आनंदी असेल तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून समाजासाठी अनेक उत्तम कार्य घडत असतात – ना. सुधिरभाऊ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित नालंदा क्रीडा मंडळ व शहरी विकास केंद्र बल्लारपूर द्वारा संचालित संस्कार व्यायाम शाळेच्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक हिरकणी ढोल पथकाने कलाकृती सादर करीत पाहुण्यांचे स्वागत केले. नालंदा क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शाल श्रीफळ, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दरम्यान,&nbsp; <b>लखनसिंह चंदेल, कनकम कुमार यल्लय्या, हरीश शर्मा </b>या तीन माजी नगरपरिषद अध्यक्षांचे त्यांच्या विशेष कार्याबद्दल सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले तसेच <b>नगरपरिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीन मुत्त्यालवार, वैभव जोशी</b> या अधिकाऱ्यांचे त्यांच्या सकारात्मक कार्यपद्धती चे कौतुक म्हणून सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तद्नंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सामूहिकरित्या महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार व्यायाम शाळेचे अध्यक्ष समीर केने यांनी केले. संचालन नरेश मुंदडा तर आभार संस्थेचे सचिव मनीष पांडे यांनी मानले. याप्रसंगी निलेश खरबडे भाजपचे अध्यक्ष काशिनाथ सिंह, सतविंदर दारी आशिष देवतळे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ इमानियल कोंड्रा निलेश जाधव डॅनियल डेव्हिड छगन जुलमे सचिन केने श्रीकांत आंबेकर ओम मुपिडवार सोनू पिंपळकर राजू दासरवार सुफियान सय्यद मिलिंद खोब्रागडे राजकुमार श्रीवास्तव निखिल निंदेकर दिनेश कोकुलवार आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *