प्रतिनिधी/ गडचिरोली : तेंदूपत्ता हंगामाच्या काळात सिरोंचा पोलीसांनी तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्हयात वाहनामध्ये आणण्यात येत असलेली 2 कोटी 20 लाखाची रक्कम जप्त केली आहे. सदर कारवाई काल 2 जून रोजी सिरोंचा तेलंगणा सिमेलगत असलेल्या गोदावरी प्राणहिता नदीच्या पुलावर करण्यात आली. पोलीसांनी दोन्ही वाहने व रोख रक्कम जप्त असून कोटयावधीच्या रक्कमेबाबत चौकशी सुरू केली आहे. परंतू आज 3 जून सकाळपर्यंत सदर रक्कम कोणाची आहे, ती कुठे नेण्यात येत होती याचा उलगडा झालेला नव्हता.
जप्त केलेल्या रक्कमेबाबत चौकशी सुरू .- पोलीस निरीक्षक अहीरकर दोन वाहनातून जप्त करण्यात आलेल्या रक्कमेची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चौकशी सुरू आहे. सदर रक्कम कोणाची आहे, कोणत्या कामासाठी आणण्यात येत होती, याचा अद्याप उलगडा झाला नसल्याची माहिती सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अहीरकर यांनी दिली.



