
केवळ मानवतेलाच नव्हे तर याच्चयावत विश्वातील मानवधर्माला सुद्धा कलंकित करणारी व स्त्री जातींची निर्गुण चेष्टा करणारी घटना भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात घडावी ही आम्हा भारतीयांची जगात मानहानी करणारी घटना होय . वसई कोळी भागात राहणारी कुमारी श्रद्धा विकास वालकर हिचे तुकडे , तुकडे करणाऱ्या आपताब नामक धर्मांध इसमाला जगण्याचाच अधिकार राहिलेला नसल्याने हिंदू मुली सोबत आपताब सारखे धर्मांध लैंगिक पिसाट जे अमानवीय कृत्य करीत आहे , त्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी द्वारा आम्ही केवळ निषेधच करीत नसून त्या धर्मांध नराधमाला त्यांनी केलेल्या कृत्या प्रमाणेच तात्काळ शिक्षा देऊन हिंदू समाजातील यच्चयावत स्त्रियांच्या संरक्षणासाठी आदर्श वस्तू पाठ न्यायालयाने घालवून द्यावा , जेणेकरून पुढे कोणाची अशी हिम्मत होणार नाही तसेच आपल्या वर्धा शहरात शाळा महाविद्यालयाच्या परिसरात आणि वाहतुकीच्या मुख्य मार्गावर लव्ह जिहादी तसेच कामातुर मजनू जे अनेक युवतींना त्रास देतात आमिषे दाखवतात त्यांचाही कडक आणि कठोर बंदोबस्त करावा , अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी दुर्गा वाहिनीचे सर्व सदस्य अटल पांडेय, राजेंद्र राजपुरोशि, महेरा राउत , किरन उपाध्ये
पल्लवी राऊत, रश्मी राजेंद्र राजपुरोहित,अनुराधा राजेंद्र कंडे,उन्नती टिपले,शिखा शर्मा, पुनस वैरागडे, सौ.कोमल देशमुख, सुरेखा कावळे,विजय हरीभाऊ लटे महेश हटवार अजिंक्य बोरकर, शैलेश राऊत, अश्विन साहू. यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




