चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विठ्ठल मंदिरात वर्षातील प्रत्येक दिवशी गरजूंना अन्नदान करण्याचा संकल्प

अक्षय तृतीया च्या पर्वावर ना हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मनीष महाराज यांची उद्घोषणा

गडचांदूर- येथील शिवराम,सरस्वती, मनोहर, विठ्ठल, रुख्मिनी देवस्थान च्या स्थापना दिन उत्सवाच्या निमित्ताने तीन दिवसीय संगीतमय भक्ती सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,संत श्री मनिष भाईजी महाराज यांच्या द्वारे या तीन दिवसांत नवविधा भक्तीचे प्रकार, सनातन हिंदू धर्म चे रक्षण, मुलांवरील सुसंस्कारा साठी पालकांची जबाबदारी, व्यसनमुक्त समाजाची आवश्यकता, इत्यादि ज्वलंत सामाजिक व धार्मिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले
      स्व,सरुबाई गाडे यांनी गडचांदूर येथे सण 1984 मध्ये बांधलेल्या मंदिरात ह भ प दिपक महाराज पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिनी ची स्थापना करण्यात आली होती, त्या निमित्ताने दरवर्षी अक्षय तृतीयेला
स्थापना दिन उत्सव साजरा केला जातो, या वर्षीपासून मंदिर व्यवस्थापन समिती तर्फे सामाजिक विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,  लहान मुलांना गायन,वादन, किर्तन, प्रवचन,संगीत, हिंदू धर्म,वेद अभ्यास इत्यादि चे शिक्षण देण्यासाठी येत्या काळात गुरुकुल आश्रम सारखे निवासी शिक्षण सुरू करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांना ,वारकरी प्रवासी भक्तगण रुग्णालयातील गरजू लोकांना दररोज अन्नदान करण्यासाठी 365 भाविक स्वयं स्फूर्तीने पुढे आले असून हा उपक्रम अधिकमासापासून सुरू करण्यात येईल अशी उद्घोषणा संत श्री मनीष महाराज यांनी ह भ प, पांडुरंग महाराज पुरी, ह भ प,दिपक महाराज पुरी व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ना हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत केली,
      विठ्ठल मंदिराच्या जागेवर  भक्तनिवास, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका , व्यसनमुक्ती केंद्र , आश्रम, प्रदूषणातून विसावा मिळावा या साठी निसर्गरम्य कृषी पर्यटन इत्यादि उपक्रम सुरू करण्यासाठी नविन आराखडा तयार करण्यात येणार आहे ,या साठी परिसरातील जनतेसोबतच हिंदू धर्माची संस्कृती जोपासण्यासाठी  व समाज हितासाठी सरकारने सुद्धा सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मनिष महाराज यांनी आपल्या प्रवचनातून केले , रात्रोला वारकरी संप्रदायाचे भजन करून  महाप्रसादाने समारोप करण्यात आला
या वेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष , माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैया अहीर यांनी सत्संग चा लाभ घेण्यासाठी विशेष उपस्थिती लावली त्या बद्दल  विट्ठल रुख्मिनी देवस्थान चे वतीने न्यासाचे अध्यक्ष ह भ प, दिपक महाराज पुरी यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला,
स्थापना दिन उत्सव साजरा करण्यासाठी किनाके महाराज,बालाजी पुरी, बंडूभाऊ पिदुरुकर, अशोक एकरे,अंबादास घोटकर, डॉ,घुले,बंडू चौधरी,मेघराज एकरे, शंकर चौधरी, गुरुनाथ कागणे,रतन भारती, पंकज गणेश इटनकर,नगरसेविका मिनाक्षीताई एकरे,प्रा,सौ संगीता पुरी, आदींचे सहकार्य लाभले,
कार्यक्रमाचे संचालन  उध्दव पुरी यांनी केले तर व उपस्थित सर्व संत मंडळी व भाविक भक्तांचे आभार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.