मूल (ता प्र ): ताडोबा वनपरिसरातील करवन ,काटवणं तालुका मूल जि. चंद्रपूर या बफरझोन मधील जंगलात गुरे चरत असतांना अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गाय व एक इसम ठार झाल्याची घटना आज दि. २५.०६. २०२० रोजी दुपारी १२, ते १२. ३० वाजताचे दरम्यान घडली करवन या गावातील रमेश वेलादी व इतर चार जण गावातील गुरे ढोरे घेऊन नेहमी प्रमाणे जंगलात चराईसाठी घेऊन गेले असता कक्ष क्र. ७६७ मध्ये गुरे चारत असतांना पट्टेदार वाघाने एका गाईवर हल्ला केला रमेश वेलादी व इतरांनी आरडाओरड केल्याने वाघाने गाईला सोडून पळतांना त्या बाजूला रमेश वेलादी हा इसम दिसताच वाघाने झडप घालून रमेश ला ठार केल्याची घटना घडली. उपस्थितांपैकी एकाने गावाकडे धाव घेत सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वन विभागाला दिली. घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी , बोबडे साहेब,वनरक्षक वासेकर मॅडम , बि. के. परचाके, पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीत उपजिल्हा रुग्णालयात मूल येथे आणण्यात आले. तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सांगितले




