ब्रम्हपुरी पासून जवळच असलेल्या तूमडीमेंढा गावाजवळ भगवानपुर येथील इसम ताराचंद चंदनखेडे वय 55 वर्ष ब्रह्मपुरी येथे डिझेल आणायला जात असताना, लघुशंकेसाठी रोडच्या बाजूला बसलेला असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाला.
सविस्तर बातमी अशी की सदर व्यक्ती हे शेतीच्या कामासाठीअड्याळ येथे शेतात टॅक्टर सुरु असल्या मुळे डिझेल साठी ब्रम्हपुरी ला जात होते. रस्यात लघुशंका लागली त्यामूळे बाजूला झाडाच्या आडोशाला बसले असता वाघाने अचानक त्याचे वर हल्ला केला.
सदर घटनेत वाघाने व्यक्तीला मेन रोड पासून दुर जंगलात ओढत नेले सकाळी 5ते 6च्या दरम्यान हल्यात मृत व्यक्तीचे हात, व डोके धडा वेगळे केल्या अवस्थेत त्याचे प्रेत काही लोकांना दिसून आले.
सदर घटनेची माहीती ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती मिळताच वनपरीक्षेत्र आधिकारी यांच्या टिमने मौका चौकशी केली व शवविच्छेदनासाठी ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले.वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
जंगलात थांबे बेतले जिवावर
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी पासून जवळच असलेल्या तूमडीमेंढा गावाजवळ भगवानपुर येथील इसम ताराचंद चंदनखेडे वय 55 वर्ष ब्रह्मपुरी येथे डिझेल आणायला जात असताना, लघुशंकेसाठी रोडच्या बाजूला बसलेला असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाला.
सविस्तर बातमी अशी की सदर व्यक्ती हे शेतीच्या कामासाठीअड्याळ येथे शेतात टॅक्टर सुरु असल्या मुळे डिझेल साठी ब्रम्हपुरी ला जात होते. रस्यात लघुशंका लागली त्यामूळे बाजूला झाडाच्या आडोशाला बसले असता वाघाने अचानक त्याचे वर हल्ला केला.
सदर घटनेत वाघाने व्यक्तीला मेन रोड पासून दुर जंगलात ओढत नेले सकाळी 5ते 6च्या दरम्यान हल्यात मृत व्यक्तीचे हात, व डोके धडा वेगळे केल्या अवस्थेत त्याचे प्रेत काही लोकांना दिसून आले.
सदर घटनेची माहीती ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती मिळताच वनपरीक्षेत्र आधिकारी यांच्या टिमने मौका चौकशी केली व शवविच्छेदनासाठी ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या इसमाच्या कुटुंबियांना वनविभागाच्या वतीने तातडीने २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र शेंडे, क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक धुडसे हे उपस्थित होते.