

घुग्घूस : हा औद्योगिक शहर जिल्ह्यात सर्वात प्रदूषित व उष्ण शहर आहे.उन्हाळ्यात या शहरात कूलर शिवाय जगणेच शक्य नाही अशी भीषण परिस्थितीत शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झालेली आहे.नागरिकांची भीषण गर्मीत पाण्यासाठी भटकंती सुरू आहे गेल्या दहा वर्षांपासून राजुरेड्डी ने शहरात बारो महिने आपल्या दोन ते तीन खाजगी वॉटर टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करीत आहे मात्र त्यांची मदत कमी पडत असल्याने त्यांनी शहरातील उद्योगांना वॉटर टॅंकर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लॉयड्स मेटल्स कंपनीने तीन वॉटर टँकर नगरपरिषदेच्या स्वाधीन केले व एसीसी कंपनीने एक टॅंकर उपलब्ध करून दिले आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकांना घरपोच पिण्याचा पाणी उपलब्ध व्हावा यासाठी रेड्डी सदैव धडपड करीत असतात त्यांच्या निस्वार्थ जलसेवेला नागरिकांनी जलसेवक ही उपाधी दिली आहे



