चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राजुऱ्यात युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला..

फलकाची तोडफोड.. वादग्रस्त विधानाबद्दल सुरज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल.
राजुरा…
 मुबंई येते राणा दाम्पत्य व शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांपासून हनुमान चालीस पठण करण्यावरून वाद सुरू होता.या वादाचे पडसाद राजुरा शहरात काल दिनांक 23 एप्रिल ला उमटले. युवा स्वाभिमानी पक्षचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी फेसबुक वरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल शिवसैनिकानी युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यालयावर हल्ला चढविला व फलक तोडले. मुख्यमंत्र्यांच्या यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या प्रकरणात युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सूरज ठाकरे यांनीही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑनलाइन तक्रारीतून केलेली आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
 युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे याने मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काल दिनांक 23 एप्रिल रोजी राजुरा येथे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली व फलक तोडले आणि निषेध केला. मुंबई येथे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठण करण्यावरून वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्र्यांवर झालेल्या वादग्रस्त विधानामुळे   शिवसैनिकानी युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यालयावर हल्ला चढविला. ही घटना काल दिनांक 23 एप्रिलला सायंकाळी आठच्या दरम्यान घडली.   सायंकाळी आठच्या सुमारास शहरातील युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला चढविला व पक्षाच्या फलकांची मोडतोड केली.कार्यालयातील खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांचे फोटो असलेले बॅनर फाडले. वेळीच पोलीस बंदोबस्त उपस्थित झाल्यामुळे वातावरण नियंत्रणात आले.
त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विरोधात तक्रार दाखल केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक पी.एस. साखरे यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
युवा स्वाभिमानी पक्षाची शिवसेनेच्या विरोधात पोलीस स्टेशनला ऑनलाईन तक्रार..
काल दिनांक 23 एप्रिल रोजी स्वाभिमान युवा पक्षाच्या कार्यालयावर झालेल्या हल्यानंतर  युवा स्वाभिमानी
 पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यात ४० ते  ५० शिवसैनिकांचा जमाव कार्यालयांमध्ये दिनांक २३/०४/२०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास मला जीवे मारण्याच्या दृष्टिकोनातून बेकायदेशीररित्या आला व माझ्या कार्यालयातील सीसीटीव्ही ची तोडफोड तसेच माझ्या कार्यालयातील पक्षाच्या एलईडी बोर्डाची तोडफोड करून घाणेरड्या शब्दांमध्ये अर्वाच्च शिवीगाळ करत दहशत माजवली . याबाबत सर्वांवर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरेश ठाकरे यांनी केली आहे.
तक्रारीत सुरज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या हेतूने कार्यालयावर धावून आले असल्याचा आरोप केला आहे. कार्यालय बंद असल्याने व कुणीही कार्यालयात उपस्थित नसल्याने थोडक्यात बचावलो . त्यांनी कार्यालयाबाहेर लागलेल्या सीसीटीव्हिंची तोडफोड केली , तसेच कार्यालयाबाहेर लागलेल्या एलईडी बोर्ड ची देखील तोडफोड केली . मला जीवे मारण्याच्या उद्देशाने हे सर्व माझ्या कार्यालयांमध्ये दाखल झाले या सर्वांपासून माझ्या जीवितास धोका आहे . करिता आपण यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी ऑनलाइन केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.