चंद्रपुर

मूल येथे कॉरेन्टाइन व कोवीड केअरची क्षमता वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

चंद्रपूर शहरातील लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद                                                              चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 309                                  

Ø  सध्या 125 बाधितांवर उपचार सुरु                                                                      Ø  184 पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे                                                                       Ø  जिवती तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव                                                     Ø  विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई सक्त                                                           Ø  शहरात आज 157 अॅन्टीजेन चाचण्या                                                               चंद्रपूर, दि. 21 जुलै : चंद्रपूर शहरदुर्गापूर व ऊर्जानगर ग्रामपंचायत क्षेत्रात 26 जुलैपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनला नागरीकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद सुरू आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 पर्यंत उघडण्यात आली होती. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू असून महानगरपालिकेने 157 अँन्टीजेन चाचण्या देखील आज पूर्ण केल्या. मंगळवारी जिल्ह्यात फक्त 4 पॉझिटिव्ह पुढे आले असून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी मुल तालुक्याचा आढावा आज घेतला. या ठिकाणची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत कोवीड केअर सेंटर व कॉरेन्टाइन सेन्टरची क्षमता वृद्धीचे निर्देश दिले.चंद्रपूर शहर व परिसरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. साखळी तोडण्यासाठी व दुपटीने वाढ होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी सध्या ब्रह्मपुरी, भद्रावती, चिमूर शहरा पाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात देखील टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. 2 मे नंतर 88 दिवसानंतर बाधितांची संख्या दुप्पट झाली होती. मात्र नंतरच्या कालावधीत केवळ 105 दिवसात 261 बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यामध्ये बाधितांची साखळी तोडल्या गेले नाही तर मोठ्या प्रमाणात संख्या वाढू शकते. अशावेळी आरोग्य यंत्रणेवर देखील ताण येऊ शकतो. त्यामुळे चंद्रपूर शहरात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी आज 21 जुलैला पाचव्या दिवशी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्हची आकडेवारी पुढे येत होती. त्याला पायबंद बसण्याची अपेक्षा आहे.दरम्यान, आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी मुल शहरातील गेल्या काही दिवसातील बाधितांची वाढलेली संख्या बघता भेट दिली. तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. मूल तालुक्यांमध्ये बिहारमधून आलेल्या 24 राईस मिल कामगार नुकतेच पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वतः भेट दिली आहे.यावेळी घराघरात तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. याशिवाय जाणाळा येथील लग्न प्रसंगातून मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. अशा पद्धतीचे कोणतेही मोठे कार्यक्रम परिसरात होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.