
मूल: येथील सोमनाथ रोडवरील मयूर शेख यांचे विलेन विला कापड दुकान तर विश्वजित उडान यांचे लक्ष्मी ब्युटी कलेक्शन या दोन्ही दुकानाला अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना गुरवारी रात्रौ १ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच मुल, चंद्रपूर, पोंभुर्णा, सावली, येथील अग्निशामक दलाला पाचारण केले परंतु आग एवढी भयानक होती की अग्निशामक गाडी येत पर्यंत दुकान पूर्ण जळून खाक झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात असून यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण आणण्याकरिता मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार सतिषसिह राजपूत व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.



