
संयुक्त संघर्ष समितीचे वतीने संबंधिताना दिले निवेदन.
चिमूर- तालुक्यातील मुरपार कोळसा खाण ही सन १९९१-९२ मध्ये सुरू केली होती. परंतु खाण व्यवस्थापन मंडळाने मुरपार भूमिगत खाण दि १६ ऑगष्ट २२ ला बंद केली असतांना खाण पूर्वरत सुरू करण्यासाठी कामगार संघटना प्रयत्न करीत असताना संयुक्त संघर्ष समिती च्या वतीने दि २९ नोव्हेंबर पासून साखळी बद्ध आंदोलन सुरू करण्यात आले असून मुरपार भूमिगत कोळसा खाण पूर्वरत सुरू करण्यात यावी, कामगारांचे दि ७ ऑक्टोबर २२चा स्थलांतर आदेश रद्द करण्यात यावे, मुरपार जनशक्ती बजट नुसार २०२२-२३ नुसार मुरपार कामगार यांना पदोन्नती देण्यात यावी, पदोन्नती करण्यात आल्यावर मुरपार कोळसा खाण सुरू होई पर्यत उमरेड क्षेत्रातील खाण मध्ये स्थलांतर करण्यात यावे, अस्थायी कामगारांना स्थायी करण्यात यावे, उमरेड ओपन कास्ट ची मर्यादा दीड वर्ष शिल्लक असल्याने मर्यादा वाढवून कामगारांना समाविष्ट करण्यात यावे अश्या मागण्यान्याचे निवेदन
क्षेत्रीय महाप्रबंधक वेकोली उमरेड क्षेत्र, अध्यक्ष सह प्रबंधक निदेर्शक नागपूर, निदेशक कार्मिक वेकोली नागपूर, तसेच चिमूर पोलीस स्टेशन आमदार बंटीभाऊ भांगडिया, उमरेड क्षेत्रा चे आमदार राजु पारवे आदी संबंधित यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संयुक्त संघर्ष समितीचे शामराव जंगम,हंसराज श्रीरामे यांनी दिली.




