
चंद्रपूर :- महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या अगदी टोकावर वसलेल्या आणि जंगल क्षेत्रापासून दुर असलेल्या पोळसा या गावात मध्यरात्रीला बिबट या वन्यप्रान्याने कहर केला. वर्धा नदीकाठी असलेल्या पोळसा गावात मध्यरात्री बिबट आला. थेट गोठ्यातील मेंढ्यावर हल्ला केला. मेंढ्यांचा हलकल्लोळ मेंढपाळाच्या कानी पडताच मेंढपाळ सरसावला. गोठ्यातील दृश्य बघून त्याच्या अंगावर काटा शहारला. बिबट मेढ्यांवर अक्षरशः तूटून पडला असतानाचे दृश्य बघून त्याने आरडाओरड केली. शेजारी धावून आलेत. तोपर्यंत बिबट्याने सात मेंढ्याना ठार केल्या होत्या तर सहा मेंढ्या जखमी झाल्या होत्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण गाव जागा झाला. लोकांचा जमाव पाहून बिबट पसार झाला. पण केव्हा नव्हे ति घटना बघून घटनेने गावात दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील पोळसा गाव गोंडपिपरी तालुक्याचा शेवटचा आणि मुख्य दोन राज्यांना जोडणारा घटक आहे. एका बाजूने वर्धा नदीचे विशाल पात्र तर दुसऱ्या बाजूने विस्तीर्ण विशाल शेतजमीन, या पोळसा गावापासून जवळपास सात ते आठ किलो मीटरच्या परिघात जंगल सदृश्य परिस्थिती नाही. सर्वत्र शेती. सध्या शेतात कापुस, सोयाबीन, तूळ पिके उभे आहेत. ह्या उभ्या पिकांचा आस्वाद घेण्यासाठी तृणभक्षक वन्यजीव शेताकडे सरसावले असताना त्यापाठोपाठ जंगली हिस्त्र प्राणी वाघ, बिबट तृणभक्षी प्राण्यांच्या मागोवा घेत त्यांच्या मागावर येत असतात. शुक्रवारच्या मध्यरात्री पोडसा गावात बिबट्याने शिरकाव केला. गावातील पत्रू भिवा गोंधळी यांच्या गोठ्यातील मेंढ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात सात मेढ्या ठार झाल्या आहेत. तर सहा मेंढ्या जखमी आहेत. या घटनेत गोंधळी यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. मोका Forest Department स्थळाचा पंचनामा तयार करुन संबंधित भागात वरिष्ठांच्या आदेशानुसार गस्त लावण्यात आलेली आहे. सदर घटनेने गावात दहशत पसरली असुन नागरिक दहशतीच्या सावटात वावरत आहेत. शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी वन्यप्राण्यांच्या व मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी मध्यचांदा वनविभाग व प्राथमिक रेस्क्यु संस्था, पुणे यांचे विद्यमाने प्रशिक्षण शिबीर धाबा व कोठारी वनपरिक्षेत्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. याचा अर्थ मानव, वन्यप्राणी या दोघांची सुरक्षा ऐरणीवर आहे हे सिद्ध होते. वन्यप्राणी जंगली भाग सोडून दहा किलो मीटरचे फरलांग गाठत असताना वनविभागाचे स्थानिक कर्मचारी काय करतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.




