चंद्रपूर (का.प्र):आज दुपारी २ ते तीन च्या सुमारास गांधी काँप्लेक्स येथे अज्ञात इसमांनी गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली.सुरज बौरिया असे मृत इसमाचे नाव आहे.सुरज बौरिया याला जवळपास तीन ते चार गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेचा पुढील तपास बालारपूर पोलीस करीत आहेत.



