चंद्रपुर

बंगाली कॅम्प परिसरात तणावाचे वातावरण

*शेकडो समर्थक रस्त्यावर,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
*मनोज अधिकारी हत्याप्रकरण
चंद्रपूर (का.प्र ): काल बंगाली कॅम्प येथील युवा नेता मनोज अधिकारी यांची म्हाडा कॉलनीत हत्या झाली होती त्यामुळे बंगाली कॅम्प परिसरात तणाव असल्यामुळे व परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी कालपासून पोलिसांची तुकडी आधीच तैनात होती. आज शवविच्छेदन झाल्यावर मनोज अधिकारी यांचामृतदेह घरी नेत असतांना त्यांचा समर्थकांनी बंगाली कॅम्प चौकात शववाटीका अडवून धरली व काल अटक केलेल्या दोन्ही आरोपींना इथे आणण्यात यावे ह्या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरु होते. ह्यावेळी रामनगर पोलिस निरीक्षक हाके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ता व कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, अमजत अली,उत्तम शहा व नगरसेवक भारत गुप्ता ह्यांनी जमावाची समजूत घालून परिस्तिथी नियंत्रणात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *