चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

प्रलंबित प्रश्नांना घेऊन प्रकल्पग्रस्तांनी घेतली पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट.

WCL क्षेत्रात नामनिर्देशित नातवांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना घेऊन प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि क्षेत्रात नामनिर्देशित नातवांशी(Grandson) संबंधित प्रलंबित प्रश्नांना घेऊन प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत पाठपुरावा सुरु असून वेकोलि नागपूर मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याविषयी बैठक झाली असल्याचे सांगितले. हे प्रकरण लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले. मारेगाव ( यवतमाळ ) तालुक्यातील शिवणी ( धोबे ) खुली खाण सुरु करण्याबाबत चार गावातील नागरिकांनी सुद्धा यावेळी भेट घेऊन ही खाण लवकर कार्यान्वयीत करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.