![]()
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा देशवासियांसोबत ऐतिहासिक शतकीय संवाद ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर (बुथ क्र. 171) शहरात थेट प्रक्षेपणाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी उपस्थित राहुन आदरणीय पंतप्रधानांचा संदेश सहकाऱ्यांसोबत ऐकला व या कार्यक्रमापश्चात उपस्थितांना संबोधित करतांना अहीर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दुरदृष्टी असणारे जागतिक पातळीवरचे नेते आहेत व आदरणीय मोदीजींच्या मन की बात मध्ये आलेला विषय जनआंदोलन झाल्याचे सांगितले. यावेळी देवरावजी भोंगळे, संजयजी धोटे, सुदर्शनजी निमकर, खुशालजी बोंडे, नारायण हिवरकर, सतिश उपलेंचवार, निलेश ताजणे, महेश देवकते, सुरेश केंद्रे, किशोर बावणे, रमेश मालेकर,अरुण मडावी, शिवाजी सेलुकर यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते व सामान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.




