चंद्रपूर,दि. 16 मे : जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी 1 रुग्ण व 13 मे रोजी 1 रूग्ण असे 2 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कृष्णनगर व बिनबा गेट परीसर प्रशासनाने सील केले असून हा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी गंभीरतेने लॉकडाऊन पाळण्याचे प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील बिनबा वार्ड, सेंट फ्रान्सिस शाळेजवळ, विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. 15 या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने व त्यांचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरु नये. याकरीता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरीकांचे हित व सुरक्षेस्तव अधिकचे उपाययोजना तातडीने करणे आवश्यक असल्याने ॲक्शन प्लॅन फॉर क्लस्टर कंटेनमेंट निर्धारित करण्यात आलेला आहे.
भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी नोवेल कोरोना व्हायरस डिसीज 2019 (कोविड-19) बाबत कंटेनमेंट प्लॅन निर्धारित केला असून त्यानुसार कोरोना विषाणुद्वारे बाधीत व्यक्ती/समुदायाच्या केंद्रबिंदू परिसरापर्यंत नागरीकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालून मज्जाव करणे बाबत निर्देशित केले आहे.



