चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पोलीस आणि नक्षलमध्ये उडाली चकमक; चकमकीत एक पोलीस जवान जखमी

गडचिरोली :  भामरागड तालुक्यातील धोडराज जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलिस विभागाला  प्राप्त होताच नक्षल विरोधी अभियान राबविन्यात आले. दरम्यान   जंगलात नक्षल्याना पोलिस जवान दिसताच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधून गोळीबार सुरु केला. क्षणाचाही विलंब न करता पोलीस जवानांनी नक्षल्यांना जशास तसे प्रतिउत्तर दिले. या चाललेल्या धुमश्चक्री चकमक जवळपास एक ते दीड तास सुरु होती अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाल्याने ” त्या” जखमी पोलिस जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले असले तरी जखमी पोलिस जवानाचे नाव कळू शकले नाही.

घटनास्थळी चकमक सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनास्थळी पोलिसांनी शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे .. दरम्यान झालेल्या चकमकित काही नक्षल्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

घटनास्थळी नक्षल्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात पोलीस जवानाना यश आल्याचे सूत्राकड़ूंन माहिती प्राप्त झाली आहे . तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असून सर्चींग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *