चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते विकासकामांचे लोकार्पण व भुमीपुजन

धिडशी, चार्ली व रामपुर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमीपुजन

पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते आज दि. 23 जुन 2022 रोजी जिल्हा विकास निधी अंतर्गत प्रस्तावित राजुरा तालुक्यातील धिडशी आणि चार्ली येथे RO WATER ATM चे लोकार्पण करण्यात आले. रामपूर येथील RO WATER ATM व वर्गखोली चे लोकार्पण सुध्दा त्यांच्या हस्ते पार पडले. रामपूर येथील ओपन जिम, सिमेंट रोड, नाली बांधकाम व स्थानिक दोन मंदीरांच्या वाल कंपाउडचे व अन्य विकासकामांचे सुध्दा भुमीपुजन त्यांच्या शुभहस्ते यावेळी पार पडले.
या कार्यक्रमास माजी जि. प. सभापती सुनिल उरकुडे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, धिडशी च्या सरपंच रितुताई हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट, चार्ली चे सरपंच सुरेंद्र आवारी, उपसरपंच सचिन धांडे, रामपुर च्या सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच सुनिता उरकुडे, कोलगावचे सरपंच पुरूषोत्तम लांडे, धिडशी येथील मधुकर काळे, सुभाष परसुटकर, बंडू पाटील काकडे, चार्ली चे रविंद्र थिपे, आनंदरावजी मालेकर, पांडुरंगजी देवाळकर, नथ्थुजी लोनगाडगे, रामपुरचे प्रकाश फुटाणे, रामा घटे, मारोती जाणवे, प्रकाश उरकुंदे, रमेश झाडे, कुदीर पाल यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.