
:पोंभुर्णा(प्रति) तालुक्यातील भटारी येथील तलावात 12 वर्षाचा आदिवासी मुलगा खोल पाण्यात बुडून मरण पावल्याची दुःखद घटना काल (7 जून ) घडली.
गटारी या आदिवासी गावातील त्तलावात लहान मुल दररोज पोहायला जात असतात.नेहमीप्रमाणे सायंकाळी भटारी येथील तलावात लहान मुल पोहायला गेले. मारोती कोवे यांचा मोठा मुलगा कार्तिक मारोती कोवे (वय 12) हा सुद्धा त्या मुला सोबत पोहायला गेला असता. तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झालाहि घटना काल सायंकाळी 04:00 च्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त गावात कळताच गावातील नागरिकांनीं तलावा कडे धाव घेतली. परंतु वेळेवर बचावकार्य न झाल्याने त्या मुलाचा मृत्यू झाला. हि बातमी ऐकून कोवे कुटुंबियांना धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे.



