
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा देशवासियांसोबत ऐतिहासिक शतकीय संवाद ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज दि. 30 एप्रिल, 2023 रविवार रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा महानगर उपाध्यक्ष मोहन चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, ज्येष्ठ नेते रमेश भुते, ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, वंदना संतोषवार, शशिकांत म्हस्के, मधुकर राऊत, राजु येले, शैलेश इंगोले, मयुर भोकरे, विशाल गिरी, अतुल रायकुंडलीया, गिरीश अने, पुनम तिवारी, गौतम यादव, सुदामा यादव, भाऊराव उताने, आदर्श मास्टे, शालु कन्नोजवार, अवदेश यादव, राजु तडसे यांच्यासह अन्य उपस्थित होते.




