चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई कधी-आ.अनिल देशमुख यांचा प्रश्न

राज्यत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने राज्यभरात सहा वज्रमुठ सभा आयोजित केल्या आहेत यातील पहिलीवज्रमुठ सभा संभाजीनगर येथे पार पडली त्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून तयारीचा आढावा घेण्यासाठी काल चंद्रपुरात पक्षाची बैठक घेतली असून मोठ्या संख्येने सर्व पक्षांचे कार्यकर्ते सभेला उपस्थित होते राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्याचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर होते आयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणे सरकारचे काम आहे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई कधी मिळेल असा प्रश्न माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी सरकारला केला वाढता धार्मिक विद्वेष लोकशाहीची हत्या आदी मुद्द्यावरून केंद्र राज्य सरकारविरुद्ध जनतेचा रोष आहे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले यावेळी पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य शहा जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड डॉक्टर अशोक जिवतडे आदी उपस्थित होते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.