चंद्रपुर

नदीतील मृतदेह बाहेर काढण्यात शोध बचाव पथकाला यश

चंद्रपूर येथील 38 वर्षीय माणसाचा मृतदेह मिळाला
नदीतील मृतदेह जिल्हा शोध बचाव पथकाने (पोलीस) यांनी पुरुष मृतदेह काढला बाहेर
चंद्रपूर,(का. प्र ): दि. 30 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली काॅलरी येथील सुभाष चंद्र विश्वाकमाॅ 38 वर्षीय पुरुष28/07/2020 जून रोजी रात्री 10.00 वा. झरपट नदी महाकाली काॅलरी पुलीया वरून दुचाकीवर वाहून गेला असतांना पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक सा.चंद्रपुर यांचे आदेशाने दिनांक 30/07/2020 रोजी जिल्हा शोध व बचाव पथकाने(पोलीस दल) बुडालेला मृतदेह झरपट नदी महाकाली मंदीर परिसर येथे बाहेर काढून दिला. जिल्हा शोध व बचाव पथकाने (पोलीस दल) मृतदेह नदीतून बाहेर काढला. व मृतदेह पोलीस ठाणे चंद्रपुर शहर सुपूर्त केला. या शोध मोहिमेत (बोट चालक ) अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते,वामन नक्षीने, उमेश बनकर, दिलीप चौहाण, गिरीश मारापे, समीर चापले, सुजित मोगरे, विकी खांडेकर, अजित बाहे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.