चंद्रपूर दि.२४ जुलै : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हयातील रहिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचे काल रात्री उशिरा ( २४ जुलैला पहाटे २.३० वाजता ) निधन झाले. या महिलेला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खाजगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते. ही महिला तेलंगणाची मूळनिवासी असल्यामुळे या महिलेचा मृत्यूची नोंद चंद्रपूर येथील कोरोना बाधित म्हणून होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोट मध्ये सदर महिला ही तेलंगाना राज्यातून २१ जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. २१ जुलै रोजी दाखल केलेल्या महिलेला श्वसनासंदर्भातील समस्या होती. तसेच ही महिला उच्चरक्तदाबाची देखील रुग्ण होती. खाजगी रुग्णालयात असताना या महिलेचा स्वॅब २२ जुलै रोजी घेण्यात आला. या नमुन्यांचा अहवाल २३ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. २३ जुलैच्या रात्री १२.५०च्या सुमारास ( २४ जुलैला )या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र २४ जुलैच्या पहाटे २.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. सदर महिला रुग्ण यांचा मूळ पत्ता तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित म्हणून होणार नाही असे स्पष्टीकरण डॉ. भास्कर सोनारकर यांनी आपल्या अधिकृत प्रेसनोट मध्ये स्पष्ट केले आहे.त्यांच्या मृत्यूची नोंद आदिलाबाद तेलंगणा येथे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात 10 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह Ø मृत्युची संख्या शुन्य चंद्रपूर, दि.20 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 70 कोरोना पॉझिटिव्ह
* गत 24 तासात 16 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,953 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 323 चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 674 वर पोहोचली आहे. तसेच […]
चंद्रपूर शहरात एकाच कुटुंबातील ४ नागरिक पॉझिटीव्ह
चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित कोरोना आजारातून झाले बरे आतापर्यतची बाधित संख्या ६२ जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १९ चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे ३ नागरिक काल २३ जून रोजी बाधित आढळले होते. आज याच कुटुंबातील […]



