चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुध्दपोर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत 4 हजार 918 वन्यप्राण्यांची नोंद

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोमवार, 16 मे बुध्दपोर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत 44 पट्टेदार वाघ, 11 बिबट्यांसह एकूण 4 हजार 918 वन्यप्राण्यांची नोंद प्रगणकांनी घेतली. ताडोबाच्या कोर व बफर क्षेत्रातील 98 मचानींवरून दोन प्रगणक व गाईडला बसविण्यात आले होते. त्यांनी चंद्राच्या प्रकाशात या वन्यप्राण्यांची नोंद घेतली आहे. कोरोना संकटामुळे दरवर्षी बौध्दपोर्णिमेला होणारी प्राणीगणना दोन वर्ष झाली नाही. दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर सोमवार, 16 मे रोजी ताडोबाच्या बफर व कोर अशा दोन्ही क्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना चंद्रप्रकाशात केली गेली. ताडोबाच्या बफर व कोर क्षेत्रात एकूण 98 मचानींवर प्रत्येकी दोन प्रगणक व एक गाईड असे तीन जणांना बसविण्यात आले होते. त्यांच्या हातात कागद, पेन तथा इतर साहित्य देण्यात आले होते. सकाळी आठ ते दुसर्‍या दिवशी सकाळी आठ या वेळात ही प्राणीगणना करण्यात आली. त्यानुसार वाघ कोर क्षेत्रात 23, बफर क्षेत्रात 21 असे एकूण 44 वाघांची नोंद घेण्यात आली. बिबट कोर 4, बफर 7, एकूण 11, जंगली कुत्रे कोर 9, बफर 27, अस्वल कोर 8, बफर 14, एकूण 22, गवा कोर क्षेत्रात 125, बफर 200 असे एकूण 325, हरीण कोर 859, बफर क्षेत्रात 350 असे एकूण 1209, सांबर कोर 649, बफर 293 एकूण 942, बारकिंग डिअर कोरमध्ये 78 तर बफर मध्ये 64 असे एकूण 142, चौशिंगा कोर 4, बफर 6 एकूण 10, रानडुकर कोर 589, बफर 680 असे एकूण 1269, निलगाय कोर 45, बफर 67, एकूण 112, लंगुर कोर 181, बफर 287, एकूण 468, रानमांजर कोर 9, बफर 15, एकूण 24, भारतीय प्रजातीचे मांजर कोर 4, बफर 2 एकूण 6, जंगली मांजर कोर 3, बफर 4, मोर कोर 156, बफर 89, एकूण 246, मुंगूस कोर 25, बफर 12 एकूण 37 असे एकूण 4 हजार 918 प्राणी प्रगणकांनी नोंद घेतली आहे, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.