चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जिल्ह्यातील तिन विद्यार्थीची विसीए क्रिकेट कॅम्प करीता निवड

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील तिन विद्यार्थीची उंडर १४ वर्ष करीता विदर्भ क्रिकेट असोसिएशनने निवड केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशन विसीए यांनी चंद्रपूर येथे उंडर १४ करीता २२ एप्रिलला निवड चाचणी आयोजित केली होती. त्यात ७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतले होते. त्यात ५ विद्यार्थीची निवड झाली. त्यांनतर नागपूर विभागीय विदर्भ चाचणी करीता नागपूरच्या विसीए मैदान वर निवड कॅम्प आयोजित केले होते. त्यात संपूर्ण विदर्भातून ७२ विद्यार्थी खेळाडू आले होते. त्यात ३० खेळाडूची निवड झाली आहे. त्यात चंद्रपूर जिल्हातून ३ खेळाडू हसनैन हकीम हुसैन युथ क्रिकेट अकादमी, आदित्य पोहेकर ग्लोबल अकादमी, देव जैन चांदा क्लब क्रिकेट अकादमी यांची निवड झाली आहे. यामध्ये तीन खेळाडू उंडर १४ करीता २० दिवसाच्या प्रशिक्षणाकरीता बुलढाणा येथे जाणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल दी हेलपींग हॅण्डचे जय राजभर, हकीम हुसैन, अजय दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते कुणाल उराडे, स्वप्नील तेलसे, हर्षवर्धन कोठारकर आदीनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *