चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांनी केली भरती रुग्णांची विचारपूस

◆ सामान्य रुग्णालयात भेट

चंद्रपूर  : बल्लारपूर येथे पादचरी रेल्वे ओव्हर ब्रिज कोसळल्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या भरती रुग्णांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रुग्णांवर रुग्णालय प्रशासनाने व्यवस्थित उपचार करावे. तसेच सामान्य रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वे ब्रिजचे ऑडिट करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या जाईल असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भरती रुग्णांच्या नातेवाईकांसोबतही संवाद साधला. मृत नीलिमा रंगारी यांच्या नातेवाईकांनी जिल्ह्यातील रेल्वे ब्रिज चांगले करण्याची मागणी केली. तसेच गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून होत नाही. सुरुवातीला वेगळे सांगितले जाते व नंतर अचानक प्लॅटफॉर्म बाबत वेगळी माहिती मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होते, असे म्हणून नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.