चंद्रपूर (का.प्र):- चंद्रपूर शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे हा निर्णय व्यापारी व जनप्रतिनिधीं यांच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.सराफा व्यापाऱ्यांनी 9 सप्टेंबर पासून 16 सप्टेंबर पर्यन्त कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.जिल्ह्यात वाढते कोरोना बाधित बघता प्रशासनाने 4 दिवसांचा जनता कर्फ्यु करणार असल्याचे आज जाहीर केले.हा जनता कर्फ्यु चंद्रपूर व बल्लारपूर शहरासाठी लागू असेल दोन्ही शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय करण्यात आला आहे.यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व शासकीय कार्यालये वगळता बाकी सर्व बंद दुकाने असणार आहे.
Related Articles
राजुरा येथील सोमेश्वर मंदिराकरीता २ कोटी ४३ लक्ष रुपये मंजूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील शिवभक्तांसाठी आराध्य दैवत असलेल्या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्वर संस्थानचा विकास व्हावा, या राज्य संरक्षित स्मारकामध्ये सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मा.ना.सुधीर मुनगंटीवार वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून मंदिराच्या संवर्धनासाठी व सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार रुपये निधी मंजूर झाला […]
*शेतकऱ्यांची सिबील ची* *जाचक अट रद्द करा*
*आम आदमी पार्टी चे* *आंदोलन* गेल्या काही वर्षात काही शेतकऱ्यांना सरकार कडून कर्ज माफी देण्यात आली किंवा काही शेतकऱ्यांचे वन टाईम सेटलमेंट अंतर्गत कर्ज भरून घेण्यात आले. परंतु कर्ज माफीतील आणि वन टाईम सेटलमेंट अंतर्गत कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आता बँका सिबिल ची अट पुढे करून कर्ज पुरवठा करण्यास तयार नाहीत, याची आपणास जाणीव आहे. परंतु […]
स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी पार पडली कार्यशाळा
सेवा व सुरक्षा शिबीर तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी चंद्रपूर – सफाई करणारे कर्मचारी हे सार्वजनीक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य करतात, इतके महत्वाचे काम करीत असतांना त्यांचे स्वतःच्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष होते. ज्याप्रमाणे घरात कर्त्या व्यक्तीचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे स्वच्छता योद्धे असलेले स्वच्छता कर्मचारी यांचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी […]



