चंद्रपुर

चंद्रपूर मनपाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात भरणारा संडे मार्केट बंद

चंद्रपूर (का.प्र):चंद्रपूर शहरात दर आठवड्यात रविवारी संडे मार्केट भरत होता.मात्र आता हे मार्केट कोरोनामुळे भरणार नसून व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रोज 20 च्या वर कोरोना बाधितांची नोंद होत आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात लागणारे दुकान, फेरीवाले यांना दुकान न उघडण्याची विनंती केली असून असे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा पालिका प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे आठवड्यातून एकदा आपला व्यवसाय थाटणारे व्यवसायिक यांची आर्थिक परिस्थिती खराब होणार मात्र अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाजारातील गर्दी नियंत्रणात आणून नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.