चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर, पोंभुर्णा बस स्थानकाच्या कामाचही घेतला आढावा मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांच्या बांधकामास तात्काळ गती देवून मूल येथील बस स्थानक दोन महिन्यांत पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीप्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. विधानभवन येथे यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेऊन चर्चा केली. ‘एस.टी.’ ही ग्रामीण प्रवाश्यांची रक्तवाहीनी आहे. प्रवासाकरीता सहज उपलब्ध होणारी व सोयीची ही व्यवस्था सर्वार्थाने बळकट व्हावी यासाठी सर्वांकश प्रयत्न करणार असून एस टी च्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीकरीता असलेली बस स्थानके सर्व सोयी सुविधायुक्त व प्रशस्त असावित असे त्यांनी आवर्जून सांगितले. स्वच्छ प्रसाधनगृह, उत्तम लाईट्स, पिण्यायोग्य पाणी आणि सुलभ बैठक व्यवस्था यांसह सर्व स्थानके उत्कृष्ठ व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मूल आगाराकरीता मंजूर करण्यात आलेल्या 150 बसेस अद्याप का मिळाल्या नाहीत, दिनांक २४ डिसेंबर,२०२१ रोजी विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात आ.मुनगंटीवार यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली, त्यावेळी मंत्र्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, कार्यवाही न झाल्याने आ.मुनगंटीवार यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त करुन, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. चंद्रपूर, पोंभुर्णा येथील बस स्थानक देखील सुसज्ज व्हावे, बांधकामास वेग आणा असेही निक्षून सांगितले. नागभीड बस स्थानकाच्या कामासंदर्भातदेखील त्यांनी माहिती घेतली. या बैठकीस चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) श्री भूषण देसाई, मुख्य स्थापत्य अभियंता श्री वादिराज काळगी, परिवहन सहसचिव श्री होळकर, वित्त सहसचिव श्री विवेक दहिफळे, सारिका मेंढे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर ८ जुलै कोरोना विषाणूचे स्वरूप दर वेळेस बदलत आहे, आज जरी रुग्णसंख्या कमी असली तरी दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यास सहकार्य करण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत केल्या.

मनपा आरोग्य विभागामार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेस योग्य ते सहकार्य मिळावे या दृष्टीने शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घेण्यात आली.
४ थ्या कोरोना लाटेच्या संभावित धोक्यात लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जात आहे. १२ ते १४ वयोगटासाठी कॉर्बीव्हॅक्स व १५ ते १७ वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सिन लस दिली जात आहे. सर्व शाळांनी लवकरात लवकर लसीकरण मोहीम राबवुन सहकार्य करण्याच्या सुचना याप्रसंगी देण्यात आल्या.
डेंग्युसंबंधी आवश्यक ती काळजी सावधगिरी बाळगण्यासाठी मनपा आरोग्य विभागामार्फत सर्व शाळांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले जाणार आहे ज्यायोगे शाळकरी मुले आपल्या घरी डेंग्युविषयी जागृती करतील. मनपातर्फे दिल्या जाणाऱ्या या कार्डचा वापर शाळाप्रमुखांनी निश्चित करावा, शिक्षक पालक बैठकीत जागृती करावी व आपल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित करावे.
रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीमेस सुद्धा शाळा महाविद्यालयांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या संस्थेत रेन वॉटर हार्वेस्टींग करावे. महानगरपालिकेतर्फे यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल. शिक्षकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यालय महाविद्यालयांना महानगरपालिकेतर्फे सन्मानीत केले जाणार आहे.या प्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.अतुल चटकी, सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.