![]()
संपूर्ण बौद्ध राष्ट्रात बुद्धजयंती मोठ्या उत्साहात व अनंदात साजरी केली जाते. बौद्ध पौर्णिमा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर तथा डॉक्टर आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 मे 2023 ला सकाळी 09 – 00 वाजता चंद्रपूर दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. बुद्ध वंदनेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय अरुण घोटेकर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, बुद्धाचा धम्म आदि , मध्यम आणि अंती कल्यणकारी आहे. म्हणून सर्वांनी बौद्ध धम्माचे आचरण करावे. प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अशोक घोटेकर यांनी उपस्थित सर्वांना बुद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख मार्गदर्शक डॉ. स्निग्धा सदाफळे यांनी बुद्धाचा धम्म माणसाला माणसाशी जोडणारा आहे असे प्रतिपादन केले. तसेच विशेष अतिथी प्रा. रवी कांबळे , चंद्रपूर यांनी बौद्ध संस्कृतीत प्रत्येक महिन्यात अष्टमी , अमावस्या व पोर्णिमा हे बौद्ध सण साजरे केले जातात यावर विशेष भाष्य केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मान. वामनराव मोडक व उपप्राचार्य डॉ. संजय बेले उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी बौद्ध पोर्णिमेचे महत्व विशद केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप रामटेके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजया गेडाम यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , चंद्रपूर शहरातील बौद्ध उपासक व उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर संस्थेकडून खीरदान करण्यात आली.




