चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 16 कोरोना पॉझिटिव्ह

* गत 24 तासात 15 कोरोनामुक्त

* आतापर्यंत 22,715 जणांची कोरोनावर मात

* ॲक्टीव पॉझिटिव्ह 83

चंद्रपूर, दि. 12 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 16 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 23 हजार 191 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 715 झाली आहे. सध्या 83 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख पाच हजार 604 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 80 हजार 578 नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 393 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 355, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 12, नागभिड एक, वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *