चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यात ठिय्या आंदोलन

* चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यात ठिय्या आंदोलन
* विराआंस समितीने केला सरकारच्या विदर्भ विरोधी धोरणांचा निषेध
चंद्रपूर, दिनांक ७ डिसेंबर-विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक ७ डिसेंबर, रोज सोमवारला दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुका स्थळावर ठिय्या आंदोलन करून सरकारच्या लोकविरोधी व विदर्भ विरोधी धोरणाचा जोरदार घोषणा देत निषेध केला. राज्य सरकारने तातडीने शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवाव्या,अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप, अरुण वासलवार, अँड.प्रफुल्ल आस्वले, सुधीर फुलझेले, सौ.मीरा कोरडे, सौ.मालन दुर्गे, किशन गरपल्लीवार, रमेश घूडसे,पांडुरंग भोयर,भारत खामनकर, दत्तात्रेय घुडसे यांनी केले. चंद्रपूर येथे किशोर पोतनवार, मितीन भागवत, अनिल दीकोंडवार,किशोर दहिकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. कोरपना येथे अरुण नवले,प्रभाकर दिवे, रमाकांत मालेकर,अविनाश मुसळे,बंडू राजूरकर,संजय येरमे,नंदा उलमाले,सुभाष तुरानकर यांनी नेतृत्व केले. जिवती येथे नीलकंठ कोरांगे, सय्यद ईस्माईल,देवीदास वारे,शब्बीर जागीरदार यांनी नेतृत्व केले.राजुरा येथे अँड.मुरलीधर देवाळकर,अनिल ठाकूरवार,रमेश नळे,हरिदास बोरकुटे,सुभाष रामगिरवार,गरिबदास चौधरी,कपिल इद्दे,शेषराव बोंडे, मधुकर चिंचोलकर,आनंद चहारे,बळीराम खुजे,भीवसन गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. ब्रह्मपुरी येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व सुदाम राठोड, लीना जोगे यांनी केले. भद्रावती येथे सुधीर सातपुते राजू बोरकर,सचिन सरपटवार, मूल येथे कवडू येणप्रेडिवार,सावली येथे मनोहर गेडाम, गोपाल रायपुरे, चिमूर येथे डॉ. रमेश गजबे, नागभीड येथे भिलारे सर, चिलबुले सर, विकास बोरकर, प्रशांत शेट्टीये यांनी नेतृत्व केले. बल्लारपूर येथे पराग गुंडेवार, संजय घुगल, गौतम कांबळे, रोहित लोणारे यांनी नेतृत्व केले. पोंभुर्णा येथे गिरधरसिंह बैस,मुरलीधर टेकाम,अशोक गेडाम,वाळके सर यांनी नेतृत्व केले. सिंदेवाही येथे सतीश पवार,बाबुराव परसावार, साळवे सर त्यांनी नेतृत्व केले.कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, वीज बिलात लावण्यात येणारे अधिभार रद्द करावे, दोनशे युनीट पर्यंतचे वीजबिल माफ करावे, पूर, खोड किडी व मावा तुडतुडे किडी मुळे धानाचे मोठे नुकसान झाले असून धान शेतकर्‍यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे अनुदान द्यावे, शेती पंपावरील भारनियमन रद्द करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी, यासह अनेक मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.नैसर्गिक व सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे. विजेच्या बाबतीत विदर्भावर सतत अन्याय झाला असून आता सामान्य नागरिक जागरूक झाले असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. शासनाने तातडीने वीज बिल माफ करून दिलासा देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.