चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२१
२६१कोरोनातून बरे ; १६०वर उपचार सुरु
चंद्रपूर(का.प्र ): दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत.आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर शहर ( २ ) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील (३ ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण १८ बाधित पुढे आले आहेत.त्यामुळे कालपर्यंत ४०३असणारी बाधितांची संख्या आज ४२१ झाली आहे.



