चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात, आजी आणि नातु जागेवरच ठार

सावली : येथुन जाणाऱ्या चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन आजी आणि नातु जागेवरच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सदर घटना आज 18 ऑक्टोम्बरला सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान घडली. कुत्र्याला वाचविण्याच्या नादात भरधाव मीनीडोअरने दुचाकीला मागुन धडक दिल्याने देवानंद दादाजी कीनेकार 27 व त्याची आजी लक्ष्मीबाई आनंदराव कीनेकार 77 रा. शीर्शी यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक देवानंद आणि आजी लक्ष्मीबाई हे पेट्रोल पंपाजवळ राहात असलेल्या मोठ्या भावाच्या घरी भेटुन आपल्या MH34-bk 0145 या दुचाकी वाहनाने शीर्शी या स्वगावी परत जात असतांना मीनीडोअर क्र MH 49-1127 या वाहनाने मागुन जोरदार धडक दीली. यात आजी आणि नातु जागीच गतप्राण झाले. या संदर्भात सावली पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार आशिष बोरकर यांनी चमुसह घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास करीत आहेत. सावली नगरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्याने नेहमीच अपघात घडत आहेत. मृतक देवानंद चे वडील दादाजी कीनेकार हे माजी पं स सदस्य होते हे विशेष. कीनेकार कुटुंबातील आजी आणि नातु जागीच गतप्राण झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.